Weight Loss: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढणं ही खूप सामान्य समस्या बनली आहे. फिट राहण्यासाठी अनेक जण महागडी सप्लिमेंट्स घेतात, मात्र त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. अशावेळी वजन कमी करण्यासाठी घरगुती आणि सोपा उपाय अधिक फायदेशीर ठरतो. तज्ज्ञांच्या मते, सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीऐवजी कोमट लिंबूपाण्याने केली तर शरीराला अनेक फायदे मिळतात. सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबूपाणी पिणं हे शरीरासाठी नैसर्गिक क्लीन्झिंग ड्रिंकसारखं काम करतं. वजन कमी होण्यासाठी कसं मदत करतं? कोमट पाणी आणि लिंबू यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम वेगाने काम करू लागतो. पचनसंस्था सक्रिय होते आणि त्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात. शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी हा उपाय सोपा, स्वस्त आणि प्रभावी मानला जातो. इम्युनिटी आणि लिवरसाठी फायदेशीर लिंबू हे व्हिटॅमिन C चे उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला, संसर्गाचा धोका कमी होतो. तसेच कोमट लिंबूपाणी हे लिवरसाठी उत्तम डिटॉक्स ड्रिंक मानलं जातं. रिकाम्या पोटी पिल्याने लिवरमधील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. त्वचेला मिळतो नैसर्गिक उजाळा लिंबूमधील अँटीऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. नियमित लिंबूपाणी पिल्याने मुरुम कमी होतात, डाग हलके होतात आणि त्वचेला नैसर्गिक तेज येतं. त्वचा हायड्रेट राहते आणि अधिक ताजीतवानी दिसते. लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत एका ग्लास कोमट पाण्यात अर्धं लिंबू पिळा. चवीसाठी थोडं मध घालू शकता, मात्र साखर टाळा. पाणी फार गरम नसावं, फक्त कोमट असणं पुरेसं आहे. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते.