रेडा – मुलांना शिक्षणा बरोबरच व्यावहारिक ज्ञानाची माहिती मिळावी यासाठी विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी 34 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पालक व ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, खाऊचे पदार्थ, मिठाई विक्रीसाठी आणले होते. खरेदीसाठी डाकेवस्ती, भोंगवस्ती, विठ्ठलवाडी, गलांवाडी परिसरातून ग्रामस्थ व पालक आले होते. यावेळी मुख्याध्यापक लतीब तांबोळी, शिक्षिका नीलिमा मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप भोंग, गोविंद बोराटे, सचिन डाके, सुनील बोराडे, नवनाथ डाके, दिलीप भोंग, दत्तू नाळे, दीपक ठोंबरे, तुळशीराम बोराटे, जगदेव भोंग, नितीन गोफणे उपस्थित होते. अंगणवाडीसेविका शोभा डाके व मदतनीस सुवर्ण बोराटे यांनी मार्गदर्शन केले.