प्राचीन काळातील जात्यावर दळली लग्नाची हळद

Updated On:

जुन्नर – परिसरातील प्राचीन इतिहासाचे अभ्यासक बापुजी ताम्हाणे ह्याची मुलगी चि. सौ. कां. रेणुका हिच्या लग्नाची हळद दोन हजार दोनशे वर्षापूर्वी च्या सातवाहन काळातील आडव्या दांड्याच्या जात्यावर लेण्याद्री येथील गोळेगांव मध्ये दळण्यात आली.

त्या संदर्भात बापुजी ताम्हाणे म्हणाले की, दोन हजार दोनशे वर्षापूर्वी सातवाहन काळातील जुन्नरच्या परिसरातील महिलाचे जीवन सुखकर करणारे प्राचीन काळातील आडव्या दांड्याचे दगडी जाते मानवी समाजाच्या पाकक्रियेत झालेल्या सुधारणाचा भाग म्हणून आडव्या दांड्याच्या जात्याची निर्मिती झाली. “जाते ” हा शब्द यंत्रकम् या यंत्रवाचक शब्दापासून बनलेला आहे.

यंत्रकम्- यंतम् – जतम् – जत व पुढे जाते हा शब्द मराठीत आला .हंड्यासारखा आकार असलेल्या या जात्याचा खालील भाग पातळ पण वरचा भाग खुप उंच व वजनदार अशा दंगडाचा आहे. जात्याचे हे दोन्ही भाग जात्याची तळी म्हणून ओळखले जातात.याची खालची तळी स्थिर असून त्या तळीच्या लाकडी खुंट्याभोवती वरची तळी फिरण्याची व्यवस्था केलेली आहे. वरच्या तळीला जाते फिरवण्यासाठी लाकडी आडवा दांडा बसविण्यासाठी समोरासमोर दोन भोके पाडलेली असतात. वरील बाजूने अंखड हळकुंडे तसेच धान्य टाकण्यासाठी सोय केलेली आहे.

दोन महिला समोरासमोर बसून आडवा दांडा हातात धरून वरची तळी फिरवत असताना मध्यभागी असणाऱ्या पेल्याच्या आकाराच्या छिंद्रातून अंखड हळकुंडे तसेच धान्य टाकून दोन तळ्याच्या घर्षणामुळे अंखड हळकुडाचे बारीक हळद तसेच धान्याचे पीठ होऊन दोन तळ्याच्या मधील भागाच्या कडेला असलेल्या फटीतून बाहेर पडते. सौ.गीताबाई बिडवई यांनी जुन्या काळातील हळदीची गाणी गायली.

‘सातवाहन काळातील हे जाते रोमन पध्दतीचे असून प्राचीन जुन्नर आणि प्राचीन रोम यांच्या दोन हजार दोनशे वर्ष जुन्या संबंधाचा पुरावा आहे. हे आडव्या दाड्याचे जाते आजही माझ्या घरी व्यवस्थित चालू असल्याने ह्याच प्राचीन काळातील जात्यावर मि लग्नाची हळद दि.९-३-२०२१ मंगळवारी दळली.’
– बापुजी ताम्हाणे, लेण्याद्री – गोळेगांव

आणखी संबंधित बातम्या

Dilip Walse Patil : आंबेगाव, जुन्नर तातडीने दुष्काळी तालुके जाहीर करा

2026-10-07 08:06:16

Dilip Walse Patil : आंबेगाव, जुन्नर तातडीने दुष्काळी तालुके जाहीर करा

Pune District : एकरी ऊस उत्पादनात यंदा घट - शेरकर

2026-09-27 08:12:35

Pune District : एकरी ऊस उत्पादनात यंदा घट - शेरकर

Pune District : येणेरेत ना डीजे, ना लेझर

2026-09-27 08:07:27

Pune District : येणेरेत ना डीजे, ना लेझर

Junnar : दुष्काळग्रस्त यादीतून जुन्नर बाहेर

2026-09-27 07:28:33

Junnar : दुष्काळग्रस्त यादीतून जुन्नर बाहेर

Teacher Award : रामचंद्र अय्यर यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

2026-09-22 21:40:21

Teacher Award : रामचंद्र अय्यर यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार