पगार थांबविला म्हणून कर्मचाऱ्याने कंपनीच्याच दोन वेबसाईट केल्या ‘हॅक’

मुंबई: कंपनीला धडा शिकवण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या कर्मचाऱ्याने कंपनीची वेबसाईट हॅक केली. कंपनीने पाच महिन्यांचा पगार थकविला, त्यात नोकरी सोडल्यानंतर कायदेशीर मार्गाने पगार मिळवलाही. तरी सुद्धा कंपनीने पगार वेळेवर दिला नाही. म्हणून कर्मचाऱ्याने कंपनीचे व्यवहार सुरू असलेल्या दोन वेबसाईट हॅक केल्या. हा सर्व प्रकार माटुंगा पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड आला.

‘दीपेश बुधभट्टी’ असे आरोपीचे नाव असून, त्याला गुजरातमधून माटुंगा पोलिसांनी गुरुवारी बेडया ठोकल्या. माटुंगा परिसरात असलेल्या तक्रारदार कंपनीचे गुजरातमध्येही एक युनिट आहे. तेथे दीपेश नोकरीला होता. एका संकेतस्थळावरून कंपनीचे आर्थिक व्यवहार सुरू होते. याची माहिती दीपेशला होती. मात्र कंपनीला धडा शिकविण्यासाठी दिपेशने २३ मार्च ते १ ऑगस्टदरम्यान कंपनीच्या दोन्ही वेबसाईट हॅक केल्या. कंपनीचे कामकाज ठप्प झाल्यामुळे कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर कंपनीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीनुसार तपास सुरु केल्यानंतर दिपेशचा हॅकिंगचा प्रताप समोर आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.