Weather Updates: पुढील 3 दिवस महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Maharashtra Rain News – सौराष्ट्र व कच्छ परिसरात अतितीय कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. हा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात प्रवेश करून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, त्याचप्रमाणे वातावरणाच्या खालच्या भरातील बाऱ्याची द्रोणिका रेषा ही गुजरात ते केरळपर्यंत सक्रिय होत आहे.
त्यामुळे गुरुवारी महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. आता आजपासून पुढचे तीन दिवस रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 2 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात वादळी वान्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
देशात सप्टेंबर अखेरपर्यंत होणार बरसात –
गुजरातसह काही राज्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थितीनंतर दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र यावर्षी देशात सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खाात्याकडून वर्तविण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यभागी कमी दाबाची प्रणाली विकसित झाल्यामुळे भारतातील पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता देण्यात आली आहे. भारतात जून महिन्यात पावसाला सुरुवात होते आणि सप्टेंबरमध्ये त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत संपूर्ण देशातून पाऊस सुट्टी घेतो. मात्र यावेळी भारतात पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पडण्याची शक्यता आहे.
पावसाच्या उशीराने माघार घेतल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास भारतातील उन्हाळी पेरणी केलेल्या तांदूळ, कापूस, सोयाबीन, कॉर्न आणि कडधान्ये या पिकांचे नुकसान होऊ शकते. कारण ते साधारणपणे सप्टेंबरच्या मध्यापासून काढायला सुरुवात केली जाते. देशातील अधिक शेतजमीन जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते. मात्र यावेळी भारतात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितल्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सोयाबीन, मका, भात, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. तसेच जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.
गेल्या आठवड्याभरापासून गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुराने थैमान घातले आहे. गुजरातमधील पावसाचा जोर ओसरल्याने शुक्रवारी परिस्थिती सुधारली असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु आता देखील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती मात्र कायम आहे. त्यातही वडोदरा आणि आणखी काही शहरांत पूरपरिस्थिती कायम आहे.





