weather update – मध्य महाराष्ट्रासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर बीड, परभणी, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात अमरावती, बुलढाणा, यवतमाळला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.