Weather Forecast : आगामी ४ ते ५ दिवस उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारताच्या काही भागांमध्ये कडाक्याची उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तवली. एप्रिलच्या उत्तरार्धात तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Forecast) हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ एप्रिल दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेची लाट तीव्र असेल. उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशामध्येही सूर्याचा प्रखर ताप जाणवणार आहे. (Weather Forecast) Weather Forecast : उत्तर भारतात कडाक्याची उष्णतेची लाट, तर महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा विशेषतः पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक घामाघूम होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरही उष्णतेचा प्रभाव कायम राहील. (Weather Forecast) एकीकडे उत्तर भारतात उष्णतेची लाट असतानाच, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र हवामानाचे वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची आणि काही ठिकाणी गारपिटीची दाट शक्यता आहे. दक्षिण आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्येही मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. दिवसाच्या वाढत्या तापमानासोबतच रात्रीच्या तापमानातही वाढ होणार आहे. हरियाणा, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्ण रात्रींचा अनुभव येईल, ज्यामुळे उकाडा अधिकच असह्य होऊ शकतो. कडक ऊन आणि संभाव्य गारपीट अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (Weather Forecast) हेही वाचा : Weather Update : देशात तीव्र उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अशांपर्यंत Rain Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील ३ दिवस सावधान