Weather Alert : राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा (Weather Alert) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उच्चांकी तापमान राहणार आहे. पुढील 3 दिवसात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्याना यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. माहितीनुसार, सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे आहे. अकोला आणि नंदुरबार जिल्हे 45.3 अंशाच्या पुढे आहेत. नागरिकांनी पुढील 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे विभागाने सांगितले आहे. पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. Weather Alert दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी होत चालल्याने उत्तरेकडील राज्यांतून गरम वारे वाहू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम विदर्भाच्या तापमानावर होत असून, पुढील काही दिवसांत तापमानात तब्बल ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तापमानाची आकडेवारी (अंश सेल्सशिअसमध्ये) अकोला – 44.9 अमरावती – 44.6 वर्धा – 43.2 बुलढाणा – 42.6 नागपूर – 42.2 ब्रम्हपुरी – 42.2 चंद्रपूर – 42.0 गडचिरोली – 41.2 गोंदिया – 40.4 १२ जिल्ह्यांना यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने 13 मे रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला आणि अमरावती या 12 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.