नगर -करोनामुळे निंबळक येथे नुकताच मायकल भारस्कर व प्रिती शिंदे याचा विवाह मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. ना बॅंड बाजा, ना वरात मात्र फिजीकल डिस्टन्सचे पालन करीत तोंडाला मास्क लाऊन वधू-वर बोहल्यवर चढले. नेवासा येथील विलास भारस्कर यांचा मायकल मुलगा असून, निंबळक येथील भगवान शिंदे यांची प्रिती ही कन्या आहे.
यांच्या विवाहाची रेशमगाठ करोनाच्या लॉकडाऊन पूर्वीच बांधण्यात आली होती. मात्र, लॉकडऊन मध्ये सर्व नियमांचे पालन करुन, मायकल व प्रिती यांचा विवाह फादर अशोक पाडळे यांनी ख्रिश्चन पध्दतीने लावला. वधू-वरांवर फुलांचा वर्षाव करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी सिताराम सकट, निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे, भगवान शिंदे, नामदेव रोकडे, राजू रोकडे, अमोल सकट, रवी मंडलिक, कैलास शिंदे आदी उपस्थित होते.