पुण्यातील झोपडीत सापडला मोठा शस्त्रसाठा; एकास अटक 

पुणे – पुण्यातील एका झोपडीत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुन्नर तालुक्यातील भटकळ परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

राजाराम अभंग असे आरोपीचे नाव असून आपण केवळ छंद म्हणून शस्त्रसाठा तयार केले. आपल्याला कोणताही स्फोट घडवायचा नव्हता, असे अभंग यांनी प्राथमिक माहितीत सांगितले आहे. यामध्ये चार गावठी इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आणि पत्र्याचे बंदुकीचे साचे हस्तगत करण्यात आले आहेत.

दरम्यान, २००३ सालीही अभंग यांना अवैध शस्त्रसाठा सापडल्याने अटक करण्यात आली होती. परंतु, त्या प्रकरणातून अभंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.