बापाचं नाव काढून बाळासाहेबांचं नाव लावलं तरच तुमची निष्ठा आम्हाला दिसेल – भास्करराव जाधव

हिंगोली – राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाचे हिंगोलीत चांगलेच पडसाद उमटले होते. प्रथम आमदार संतोष बांगर व नंतर खासदार हेमंत पाटील हे दोघे शिंदे गटात दाखल झाले. हे दोन लोकप्रतिनिधी गेल्यानंतर जिल्हा शिवसेना कमकुवत होत असल्याचे चित्र रंगवीले जात होते. अशात संपर्कप्रमुख म्हणून जिल्ह्याची जबाबदारी बबनराव थोरात यांच्यावर आली. थोरात यांनी सूत्र स्वीकारताच पक्षाची गळती थांबली व इन्कमिंग सुरू झाली.
काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे व अपक्ष जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांना एकाच दिवशी प्रवेश घेऊन शिवसेनेने विरोधकांना चांगला धक्का दिला. दरम्यान येणाऱ्या नेत्यांना मोठा सन्मान मिळत असल्याची नाराजी काही जुन्या कार्यकर्त्यांना दाखविली होती. या कार्यकर्त्यांना लगेच मुंबईत बोलावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते समजूत घालण्यात आली. त्यामुळे पक्षातील नकारात्मक सुरतुर बंद झाले आहेत.
शिवसेनेमध्ये काहीही नाराजी नाहीये, शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी आज हिंगोली मध्ये कार्यकर्त्यांसाठी उत्साह वाढविणारा मेळावा आयोजित करण्यात आला होता. संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बाळासाहेबांचा फोटो पोस्टरवर लावण्यावरून खोचक शब्दात टीका केली आहे, शिवसेना पक्षप्रमुख आमचे नेते आहेत, आमचे तारणहार आहेत, म्हणणाऱ्या गद्दारांनी स्वतःच्या घराच्या पुढे लावलेल्या पाटीवरील बापाचे नाव काढून शिवसेनाप्रमुखांचे नाव लावले पाहिजेत, तुम्ही स्वतःच्या बापाचे नाव काढून बाळासाहेबांचे नाव लावल तरच तुमची निष्ठा आम्हाला दिसेल, तुमची निष्ठा आम्हाला पाहायची आहे, अशा शब्दात टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबरच उदय सामंत यांच्यावर देखील जाधव यांनी टीका करत सामंत एवढा भंपक माणूस मी पाहिला नाही, सामंत हे स्टंटबाजी करून स्वतः चे पोलीस संरक्षण वाढवून घेतात असा घणाघात देखील या वेळी जाधव यांनी केला. भास्कर जाधव हे हिंगोली शहरात शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.
हिंगोलीत बाळासाहेबांनी भाजपाला सांभाळले म्हणून आज ते मोठे झाले पण शिवसेनेला सांभाळायचे होते तेव्हा भाजपने फक्त त्रास दिला. एवढेच नव्हे तर अमित शहा महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला मातीत मिसळण्याची भाषा करतात, शिवसैनिकांना त्यांना सोडू नका आगामी निवडणुकीत त्याचा बदला घेऊ ही भाषा करणाऱ्यांना मातीत घालू, असे आवाहन शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी हिंगोली येथील मेळाव्यात केले.
महात्मा गांधी चौक परिसरात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला संपर्कप्रमुख बबन थोरात, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा, ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, माजी आमदार संतोष तर्फे अजित मगर, गोपू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
जाधव पुढे म्हणाले, ते गद्दार झाले ते आगामी काळात दिसणार नाहीत. असा एक सर्वे आला आहे कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हटवून शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार पाडत भाजपने घात केल्याचा जनतेत राग आहे. उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार च्या निर्णयामुळेच गद्दारांना पूर्वी व नंतरही मंत्री होण्याची संधी मिळाली .राज्यात राष्ट्रवादी व भाजपचे सरकार असते तर हे शक्य होते का? जर राष्ट्रवादी मान्यच नव्हती तर मंत्रीपद न घेता आमदार म्हणून काम करायला का तयार झाली नाही? माझ्या वडिलांचे नाव का घेता तुमच्या वडिलांचे नाव घेऊन जनतेसमोर जा असे, उद्धव ठाकरे यांनी आव्हान देतच या गद्दारांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष आहेत, त्याचे नाव कोणीही घेऊ शकते, असा सूर लावला. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पदावरून हटवली तर आता तुमच्या मंत्रीपदाची पाटी बाळासाहेबांना बाप म्हणून लावा तर तुम्हाला बाळासाहेबांचा शिवसैनिक मानतो, असे उत्तर जाधव यांनी दिले.





