सातारा, दि. ५ – माझ्या प्रत्येक वाटचालीत तुमचा पाठिंबा असून त्याच ताकतीने भाजपा सदस्यता महाअभिनात हातभर लावणे गरजेचे आहे. आपण सभासद नोंदणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात नंबर वन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सदस्यता महा अभियानात सर्वांनी ताकतीने काम करून सभासद नोंदणीमध्ये आपल्या जिल्ह्याचा राज्यात नावलौकिक करू, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. कोंडवे (ता. सातारा) येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा सदस्यता महाअभियनाचा शुभारंभ ना. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ना. भोसले बोलत होते. यावेळी सदस्यता महा अभियान 2025 रथाचा शुभारंभ करून सुमारे 250 सभासदांची नोंदणी करण्यात आली. दरम्यान भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने सभासद नोंदणीचा निश्चय व्यक्त केला. यावेळी माजी सभापती धर्मराज घोरपडे, सौ. सरिता इंदलकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सरचिटणीस वैभव यादव, सरपंच मोहित चोरगे यांची उपस्थिती होती. ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ताकतीचा व काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. जिल्ह्याला भाजपाने चार मंत्री देऊन ताकद वाढवलेली आहे. फडणवीस यांनी मला मंत्रिपद देऊन जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याची संधी दिली आहे. मंत्री पदाच्या माध्यमातून दिलेले काम परिपर्ण करून त्या संधीचे सोने करणार आहे. आपण सर्वांनी भाजपा सदस्यता महाअभियनामध्ये ताकतीने काम करून सभासद नोंदणी करावी. प्रत्येक कार्यकर्त्यांनी सुमारे 150 सभासद नोंदणी करून यामध्ये एक लाखाचा टप्पा परिपूर्ण करायचा आहे. देशपातळीवर या नोंदणीची तपासणी करून त्याची नोंद ही घेतली जाते. याची दखल घेऊन आपण सभासद नोंदणीमध्ये राज्यात जिल्ह्याचा नावलौकिक कराल, अशी मला खात्री आहे. या अभियानाप्रसंगी सभासद नोंदणी विषयी माहिती महेश गाडे यांनी दिली. या अभियानास कोंडवे व लिंब गटातील पदाधिकारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जेष्ठ नेते मधुकर निंबाळकर, माजी सरपंच किरण गाडे, उपसरपंच अर्चना भुजबळ, दिपाली गाडे, मंदा गाडे ,दिलीप निंबाळकर, फारुख खान, अनिल वीर, लालासो भुजबळ, मानाजी निंबाळकर, सुरेश टिळेकर, रमेश चव्हाण, अरुण पवार, गौरव इंगवले, मनोज घाडगे, मच्छिंद्र गोगावले, अर्जुन घाडगे, नवनाथ ननावरे, आयुब मोकाशी, महेश अहिरे, अनिकेत चव्हाण, आदी उपस्थित होते. संभाजी इंदलकर यांनी प्रास्ताविक केले. सलमान आतार यांनी आभार मानले.