मंचर : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत, मंचर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार नगराध्यक्षा राजश्री गांजाळे यांनी व्यक्त केला. मंचरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा राजश्री दत्तात्रय गांजाळे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मंचर यांच्या वतीने सत्कार मंचर येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष राहूल बाणखेले होते.यावेळी पतसंस्थेचे संस्थापक रवींद्र त्रिवेदी, उपाध्यक्ष किशोर बाणखेले, संचालक कैलास राजगुरव, संतोष रेपाळे, उमेश थोरात, संतोष धरम, मीनाबाई बाणखेले, सुदर्शना बाणखेले, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश थोरात तसेच पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.नवनिर्वाचित नगरसेवक धनेश मोरडे यांनी सत्कारास उत्तर दिले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थापक रवींद्र त्रिवेदी यांनी केले.