“दहशतवाद्यांचे कर्म बघून त्यांचा खात्मा केला, हाच आपला धर्म”; काश्मीरमधून राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

Operation Sindoor | ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी उपस्थित आहेत. संरक्षणमंत्री सीमेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. तसेच जवानांचे मनोबल वाढवतील.
यावेळी राजनाथ सिंह यांनी “सैनिकांनी केलेल्या कामगिरीचा गर्व आहे. आपल्या सैन्याचा निशाणा अचूक हे जगाला माहित आहे. ऑपरेशन सिंदूर हे दहशत वादाविरोधात मोठी लढाई आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारले. आपण दहशतवाद्यांचे कर्म बघून त्यांचा खात्मा केला, हाच आपला धर्म आहे,” असे सांगितले. काश्मीरच्या बदामी बाग छावनीतून ते बोलते आहेत.
भारतीय लष्कराचे पाकिस्तानला प्रत्युत्तर
दरम्यान, 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 15 दिवसांनी भारतीय लष्कराने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यात अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानने भारतातील शहरांना लक्ष्य केल्यानंतर, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व हल्ले उलथून त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
त्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांनी परस्पर चर्चेनंतर शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. मात्र, काही तासांनंतरच पाकिस्तानने त्याचे उल्लंघन केले, ज्याला भारतीय लष्कराने कडक प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा :
‘रेड 2’ चित्रपटात इलियाना नसण्यामागचे कारण समोर; दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितले…





