Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग नवव्यांदा पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून पगारदार वर्ग, मध्यमवर्ग, महिला आणि व्यवसायांसह सर्व क्षेत्रांना महत्त्वपूर्ण दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पाबाबत सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तर राजकीय वर्तुळात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अर्थसंकल्पापूर्वी काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी, “या अर्थसंकल्पाकडून आम्हाला फारशा अपेक्षा नाहीत, पण पाहूया काय होते,” असे विधान केले आहे. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर टीका केली आहे. Union Budget 2026: “ज्या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही, त्या सरकारच्या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा ठेवायची? हा अर्थसंकल्प केवळ 5 टक्के लोकांसाठीच बनवला जातो,” असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. तसेच सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. Union Budget 2026: Gold-Silver Crash: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 26,000 तर सोने 13,000 रुपयांनी स्वस्त शशी थरूर यांचे विधान केंद्रीय अर्थसंकल्प 2026 वर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, वित्त मंत्री काय घोषणा करतात याची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. आर्थिक सर्वेक्षणात चांगल्या आर्थिक वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, मात्र खरी समस्या ही आहे की या वाढीसोबत रोजगारनिर्मिती होणार का? रोजगारविना होणारी वाढ कोणाच्याही फायद्याची नसते. देशातील युवकांसाठी अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारकडे कोणत्या योजना आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. याशिवाय केरळमध्ये येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार केरळसाठी कोणते फायदे जाहीर करते, याकडेही सर्वांचे लक्ष असेल, असेही शशी थरूर म्हणाले. हेही वाचा: Union Budget 2026: यंदा तामिळनाडूच्या परंपरेचा अर्थमंत्र्यांकडून सन्मान ; निर्मला सीतारमण यांच्या कांजीवरम सिल्क साडीने वेधले सर्वांचे लक्ष