लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून नाराज उमेदवारांच्या पक्षातील एन्ट्री आणि एक्झिटचे सत्रच सध्या अवघ्या देशामध्ये पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रचारा दरम्यान आपल्या वादग्रस्त विधानामुळे काही नेते चर्चेत आले आहेत. अशातच कर्नाटकातील जेष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांच्या जन सभेत प्रचारा दरम्यान वादग्रस्त व्यक्तव्यामुळे नवीन वादंग निर्माण झाले आहे.
केएस ईश्वरप्पा यांनी प्रचारावेळी कर्नाटकमधील कुरबा आणि अल्पसंख्यक समुदायला उद्देशून म्हंटले, ‘मुस्लीम समुदायाला काँग्रेसने फक्त वोट बँक म्हणून उपयोगात आणले आहे. तुम्हाला काँग्रेसने कधीच उमेदवारी दिली नाही. मुस्लिमांना भाजप यासाठी तिकीट देत नाही कारण मुस्लिम समुदाय भाजपवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला तिकीट आणि अन्य सुविधाही पुरवू.’
KS Eshwarappa, BJP while addressing members of Kuruba & minority communities in Koppal: Congress uses you only as vote bank, doesn’t give you ticket. We won’t give Muslims tickets because you don’t believe in us. Believe us & we’ll give you tickets&other things. #Karnataka (01.4) pic.twitter.com/3YbqCgwk2C
— ANI (@ANI) April 2, 2019