“सर्वाधिक निरोध तर आम्हीच वापरतोय” ओवेसीचा मोहन भागवतांवर पलटवार

नवीदिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करत देशाने लोकसंख्येबाबत सर्व सामावेशन धोरण बनवायला हवे अशी इच्छा व्यक्त केली होती. यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोहन भागवतांवर निशाणा साधत लोकसंख्येबाबतच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.
मुसलमानांची लोकसंख्या कमी होत आहे असं ओवेसी म्हणतात. मुसलमान दोन मुलांमध्ये अंतर देखील योग्य पद्धतीने ठेवतात. सर्वाधिक निरोधचा वापर कोण करत ? आम्हीच करतो.. यावर मोहन भागवत काही बोलणार नाही असं स्पष्ट मत ओवेसी यांनी व्यक्त केलं आहे. एका सभेमध्ये ओवेसी यांनी लोकसंख्येबाबत आपले विचार प्रकट केले ज्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
#WATCH | On RSS chief Mohan Bhagwat’s statement that there’s a religious imbalance in India, AIMIM chief Asaduddin Owaisi says, “Don’t fret, Muslim population is not increasing, it’s rather falling… Who’s using condoms the most? We are. Mohan Bhagwat won’t speak on this.” pic.twitter.com/kcaYLaNm7A
— ANI (@ANI) October 8, 2022
काय म्हणाले होते भागवत
भारताने सर्वसमावेशक विचार करून लोकसंख्या धोरण तयार केले पाहिजे आणि ते सर्व समाजाला समानपणे लागू केले पाहिजे. समुदाय आधारित लोकसंख्या असमतोल हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते.





