Hina Khan On Mrunal-Bipasha | अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तिने अभिनेत्री बिपाशा बसूवर शरीरावरून टीका केली होती. मृणालने स्वतःला चांगलं म्हणत बिपाशाला मर्दानी म्हटले होते. ज्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाऊ लागली. अखेर मृणालने या कमेंटबद्दल माफी मागितली. आता हिना खानने या प्रकरणात मृणालचं समर्थन केले आहे. मृणालने तिची चूक मान्य केल्याचा अभिमान असल्याचे हिनाने म्हटले आहे. हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. ज्यात तिने लिहिले, ‘ज्ञान हे ज्ञानाच्या झाडाचे फळ आहे जे अनुभवांमध्ये रुजलेले आहे. आपले सामाजिक कौशल्य, संवाद आणि समजुतीची खोली काळानुसार येते. आपण सर्वजण चुका करतो, विशेषतः जेव्हा आपण तरुण असतो.’ हिना खान पुढे लिहिते, ‘मी मृणालला समजू शकते. मीही भूतकाळात अशा मूर्ख चुका केल्या आहेत. आपल्यापैकी बरेच जण खूप चुका करतात, पण ते हाताळण्याचे कौशल्य सगळ्यांमध्येच नसते. काळाबरोबर आपण बदलतो, आपण दयाळू, करुणामय बनतो.’ Hina Khan On Mrunal-Bipasha | मृणालसोबत हिना खानने तिच्या स्टोरीत बिपाशा बसूचेही कौतुक केले आहे. तिने लिहिले आहे की, ‘बिपाशा आणि मृणाल दोघीही उत्तम महिला आहेत. बिपाशा सगळ्यांसाठी प्रेरणा आहे. मृणालने तिची चूक स्वीकारली याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे’, असे म्हणत हिनाने मृणालला पाठींबा दिला आहे. Hina Khan On Mrunal-Bipasha | मृणालने मागितली माफी मृणालने माफी मागत लिहिलं की, ‘मी १९ वर्षांची असताना खूप मूर्खपणा केला. माझे शब्द आणि विनोद किती दुखावणारे असू शकतात हे मला त्या वेळी कळलं नाही. माझा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता, पण मी चुकीचे बोलले. आता अनुभवाने मला कळलं आहे की, सौंदर्य आणि आकर्षण अनेक प्रकारे ओळखता असते. प्रत्येकाची स्वतःची वेगळी ओळख असते.’ Hina Khan On Mrunal-Bipasha | हेही वाचा : Javed Akhtar: “औकातीत रहा…”, जावेद अख्तरचा ट्रोलला करारा प्रतिउत्तर