Watermelon Death Case : दक्षिण मुंबईतील पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. 25 एप्रिलला रात्री दीड वाजता बिर्याणीनंतर, कलिंगड खाल्ल्यानंतर पहाटेपासून त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. यानंतर उपचारादरम्यान या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. या सर्वांना कलिंगडातून विषबाधा झाली असावी, असा अंदाज त्यावेळी अनेकांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाच्या घरातून अर्धवट उरलेल्या कलिंगडाचे नमुने घेतले होते. हे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अहवालानुसार डोकाडिया कुटुंबीयांच्या घरात आढळलेल्या कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही. कृत्रिम रंग अथवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा खुलासा (Watermelon Death Case) एफडीएच्या अधिकाऱ्यांनी डोकाडिया कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. यात बिर्याणी, कलिंगड, माठातील व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश होता. कलिंगडात रंग, गोडवा तसेच त्याचा आकार वाढवण्यासाठी कोणताही कृत्रिम रंग अथवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा खुलासा FDA ने केला आहे. त्यामुळे कलिंगडातील भेसळीमुळे डोकाडिया कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याची शक्यता नसल्याचे समोर येत आहे. Watermelon Death Case तसेच डोकाडिया कुटुंबाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इतर खाद्य नमुन्यांमध्ये अद्याप कोणतीही भेसळ आढळली नसल्याचेही FDA च्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता डोकाडिया कुटुंबीयांच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले आहे. डोकाडिया कुटुंबातील आई-वडील आणि लहान मुलींच्या मृतदेहांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांच्या मेंदू, हृदय आणि आतड्यांमध्ये असामान्य बदल दिसून आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती वेगळी असून एखाद्या विषारी घटकाचा शरीरात वेगाने प्रसार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कुटुंबप्रमुख अब्दुल्ला यांच्या शरीरात मोर्फिन आढळल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. (Watermelon Death Case ) दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन जप्त केले असून कोणतेही संशयास्पद संपर्क होते का, याचीही चौकशी सुरू आहे. तसेच कुटुंबप्रमुखांच्या व्यावसायिक आणि बँक व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. Watermelon Death Case हेही वाचा: Twinkle Khanna: बेडरूम सोडेन पण ‘ही’ जागा नाही सोडणार; ट्विंकल खन्नाचा खास खुलासा