सोनिया गोरे यांच्या हस्ते नेर तलावातून माणगंगा नदीत सोडण्यात आले पाणी
Updated On:

गोंदवले (वार्ताहर) : जिल्हे काठापूर योजनेद्वारे नेर तलावात आलेले पाणी आज माण तालुक्यातील आंधळी धरणाकडे सोडण्यात आले. या पाण्याने माणगंगा नदीमधील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी भरुन घेण्यात येणार आहे.
श्री सिध्दनाथ पतसंस्थेच्या स्वीकृत संचालक आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते नेर तलावातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी आंधळी धरणातून दहिवडी , गोंदवले, म्हसवड अशा परिसरातून राजेवाडी तलावापर्यंत जाणार आहे. यावेळी माणगंगा नदीमधील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार आहेत.
नेर धरणातून पाणी सोडताना चेअरमन अरुण गोरे, संजय गांधी, अर्जुन काळे, सोमनाथ भोसले, दादासाहेब काळे, अपर्णा भोसले, प्रमोद जगदाळे यांच्यासह माण खटावमधील ग्रामस्थ उपस्थित होते.





