पिंपरी-चिंचवड शहरातील गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठा राहणार बंद !

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील पाणीपुरवठा विभागाच्या से. क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करण्यात येत आहेत. त्याचबरोबर शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
त्यामुळे शहरातील उपनगरांमध्ये गुरुवारी (दि. ३०) सकाळी होणारा पाणी पुरवठा नियमित होईल. परंतु, सायंकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात आल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि. ३१) होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल. तरी, नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.





