पुणे : पर्वती एमएलआर टाकीच्या हरकानगर, भवानीपेठ येथील नलिकेवर ४५० मि.मी. बटरफ्लाय व्हॉल्व बसवणे, तसेच समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३०० मि.मी. व्यासाची नलिका ५०० मि.मी. ला जोडण्याचे काम करण्यासाठी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा गुरुवारी (दि. २६ ) बंद राहणार असून, शुक्रवारी (दि. २७) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. पाणीपुरवठा बंद असणारा भाग पर्वती एमएलआर टाकी परिसर – शंकरशेठ रसा परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, भवानीपेठ, नानापेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीजमागील परिसर, पर्वती दर्शन- मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रस्ता परिसर, मुकुंदनगर, महर्षिनगरचा काही भाग, टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी आदी.