पिंपरी | गुरुवारी दापोडीचा पाणीपुरवठा बंद राहणार

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरामधील दापोडी गावचा पाणीपुरवठा गरुवारी (दि.25) सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार आहे. तसेच दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि. 26) दापोडीमधील सर्व भागात होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपळे गुरव ते दापोडीला जोडणार्या पुलावरील ग्रॅव्हीटी पाइपलाइनचे पाणीपुरवठा विषयक अत्यावश्यक कामकाज करायचे असल्यामुळे गुरुवारी (दि.25) शहरामधील दापोडी गावचा पाणीपुरवठा सकाळी बंद राहणार आहे.
दापोडी परिसरातील सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दापोडीमधील सर्व भागात दुसर्या दिवशी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





