अहिल्यानगर : महावितरणकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवारी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत वीज पुरवठा बंद राहणार असून, या कालावधीत मनपाकडूनही पाणी योजनेची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार आहे.
शनिवार दि. 7 डिसेंबर बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारस नगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागास सकाळी 11 नंतर पाणी पुरवठा होणार नाही. या भागास रविवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
रविवारी दि. 8 डिसेंबर पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायकनगर या भागात रविवार ऐवजी सोमवारी पाणी सोडण्यात येणार आहे.
सोमवारी दि. 9 डिसेंबर पाणी पुरवठा होवू घातलेल्या सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी या भागात मंगळवारी दि. 10 डिसेंबर पाणी सोडण्यात येणार आहे.