पुणे जिल्हा | भोरमध्ये १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

भोर, (प्रतिनिधी) – टँकरसाठी भोर तालुक्यातील पश्चिमेकडील मांढरदेव डोंगर रांगेतील वरवडी खुर्द, ,वरवडी डायमुख, हिरडस मावळ खोऱ्यातील उंबर्डे, शिळिंब, राजीवडी, वारवंड, पऱ्र्हर बु. , नानावळे (शिंदेवस्ती), जयतपाड हुंबेवस्ती, नीरा देवघर धरण क्षेत्रातील शिरवली हिमा, कुडली खुर्द, धानवली हायवे लगतच्या गावामधील शिंदेवाडी, ससेवाडी, करंदी खेबा , मोरवाडी (पाचलिंग) येथे पाण्याचा पुरवठा टॅंकरद्वारे केला जात आहे.
करंदी खे.बा (लोकसंख्या १२६८), नानावळे- शिंदेवस्ती (लोकसंख्या ६०), प-हर बु.मधील कचरे वस्ती,उब्रांटकर वस्ती (लोकसंख्या३१०), अंशिपी-उंबार्डे (लोकसंख्या१५४), शिळींब- राजवडी (लोकसंख्या४६९) मोरवाडी-पाचलिंग (लोकसंख्या३४८), शिंदेवाडी (लोकसंख्या ५५५०), ससेवाडी (लोकसंख्या१४९५), वारवंड(लोकसंख्या २२०), वरोडी खुर्द (लोकसंख्या ६२२), वरोडी डायमुख (लोकसंख्या ४९६), जयतपाड हुंबेवस्ती (लोकसंख्या ६०), तसेच पंचायत समितीकडे शिरगाव, कुडली खुर्द,शिरवली हि.मा.,धानिवली ग्रामपंचायतींनी टँकरचे प्रस्ताव दिले आहेत.
यंदा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात आले या वर्षी टँकरची संख्या यंदा कधी नव्हे ती वाढली आहे. जसा मे महिन्याला सुरुवात झाली.
तसे भोर तालुक्यातील गावातून पाणी टंचाईने उग्ररूप धारण केल्याने होणार आहे. भोर तालुक्यात १२ गावांना व त्यातील वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू असून चार गावांचे टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्रस्तावित असल्याचे भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.
यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान, उन्हाची तीव्रता जास्त तसेच धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने धरणातील पाणी साठा अल्प प्रमाणात राहिल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळेच यंदा एप्रिलमध्येच पाण्याचे संकट तालुक्यातील गावांवर आले असल्याने त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. धरणक्षेत्रातील विशेष करुन धरणाच्या पश्चिमेकडील टोकाच्या गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याने धरण उशाला घोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.
यंदा पाणी टंचाईचे प्रमाण वाढल्याने टँकरसाठी ज्या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आले आहेत. त्यांना तातडीने मंजूरी देण्यात येत असून ज्या गावात पाणी टंचाई निर्माण झाली असेल तेथून तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावेत. त्याचा योग्य तो पाठपुरावा करून तातडीने टँकर सुरू करण्यात येतील. – राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, भोर
एप्रिलमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.पंचायत समिती पाण्याचा प्रस्ताव केल्यावर पंचायत समितीने प्रस्ताव मंजूर करून पाण्याचे टॅंकर सुरू केल्याने पाण्याची समस्या कमी झाली आहे.यामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याबरोबर काही अंशी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. – शीतल संदीप भिलारे, सरपंच, वरवडी खुर्द, ता.भोर





