रनवेवरील पाणी आ. काळेंमुळे पाझर तलावात ः गुंजाळ

कोपरगाव –  काकडी विमानतळाच्या रनवेवरील पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून पाझरतलावात सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी माजी आमदारांकडे केली होती. त्यावेळी त्यांनी काकडी ग्रामस्थांन दिलेला शब्द दिला होता. ते मृगजळ ठरले होते. मात्र आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय कुणी घेण्याचा खटाटोप करू नये, असा टोला शेतकरी बाबासाहेब गुंजाळ यांनी प्रसिद्धी पत्रकात लगावला आहे.

माजी आमदार पुत्रांनी काकडीकरांचे प्रश्‍न आपल्या मातोश्रींनी मार्गी लावल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले होते. त्याबाबत गुंजाळ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काकडी सारख्या कायम दुष्काळी परिसराचा विकास व्हावा, या उद्देशातून माजी आमदार अशोकराव काळे यांनी शेजारच्या तालुक्‍यात जाणारे विमानतळ 2009 साली काकडीला आणले. प्रकल्प ग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून दिला. भूमिपुत्रांना नोकरी दिली.

गावासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. मात्र मागील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुर्दैवाने हा प्रकल्प पूर्ण होवू शकला नाही. आ. आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकरणाकडून दिलेली आश्वासने पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा केला. वेळप्रसंगी न्यायालयात जावून त्यांनी काकडी व परिसरातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. त्याची परतफेड काकडी व परिसरातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत करून दिली.

याउलट माजी आमदारांनी मागील पाच वर्षांत फक्त देखावा करण्याचे काम केले आहे. त्यामुळेच काकडी व परिसरातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली. माजी आमदारांनी रनवेवरील पाणी वळविण्याबाबत केलेला भ्रमनिरास पाहून आम्ही आमचे गाऱ्हाणे आ. ष काळे यांच्याकडे मांडले. त्यांनी त्याबाबत विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. त्यामुळे हा प्रश्‍न सुटला असल्याचे गुंजाळ यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.