पुणे : जेजुरी नगरपरिषदेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वीर जलाशयातून जेजुरीसाठीची पाणी योजना जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केलेली 35 कोटींची पाणी योजनेची फाईल पुन्हा उघडण्याची आणि वीर धरणाचे पाणी जेजुरीत आणण्याचे आश्वासन जेजुरी पालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी दिले. या योजनेमुळे 2050 सालापर्यंत जेजुरीतील स्थानिकांना आणि देवदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता मिळाल्यावर पहिल्या १०० दिवसांत ही फाईल पुन्हा उघडणार,असल्याचे सांगितले. होऊ घातलेल्या 2025 च्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काॅंग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा देवसंस्थान प्रमुख संदीप जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी जेजुरीकरांची लक्षणीय गर्दी, विशेषतः महिलां मोठ्याप्रमाणावर उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमात कार्यकत्यांनी व मतदारांनी जयदीप बारभाई यांना पाठिंबा दर्शवला. प्रचाराच्या सुरुवातीलाच झालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे निवडणुकीची रंगत वाढल्याचे चित्र जेजुरीनगरीत पाहावयास मिळत आहे.