Water Crisis : कडक उन्हाळ्याचा फटका सर्वसामान्यांच्या पाणीपुरवठ्यावर (Water Crisis) होत आहे. मुंबई शहरात 15 मे पासून 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय (Water Crisis) आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिकेचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. Water Crisis भारतीय हवामान विभागाने पुढील वर्षी अल निनो व आयओडी बाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी मान्सूनचे प्रमाण लक्षात घेता जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार ही पाणीकपात लागू केली आहे. तसेच, भातसा धरणातील निभावणी साठ्यातून 1,47,092 दशलक्ष लीटर, तर अप्पर वैतरणा धरणातील निभावणी साठ्यातून 90 हजार दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. तरीही, वाढत्या तापमानामुळे वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा 10 टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर पाणीपुरवठा (Water Crisis) नियोजनपूर्वक करता यावा. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपातीचा हा निर्णय घेतला आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सांगितले. समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांतील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.