धक्कादायक ! वाशिममध्ये ट्रकच्या भीषण धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
Updated On:

वाशिम : वाशिममधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये वाशिम-अमरावती महामार्गावर झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगरुळपीरनजीक साखरा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रकने जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काय घडले नेमके?
राजू देवराव खोरणे आणि अनिल देवराव खोरणे हे दुचाकीने वाशिमवरून गावी निघाले होते. पारडी या गावी जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.
खोरणे यांच्या बाईकला भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने दोन्ही भाऊ जागीच ठार झाले तर बाईक पूर्णतः ट्रकखाली जाऊन चक्काचूर झाली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून वाशिम ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.





