Nashik TCS Case : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्र हादरला. या प्रकरणानतंर अनेक धक्कादायक प्रकरणे उजेडात आली. नाशिकमधीलच एका धर्मांतराच्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. ते प्रकरण म्हणजे TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. मात्र, मुख्य संशयित आरोपी निदा खान अद्यापही फरार असून तिच्या मागावर पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलिस तपासादरम्यान चौघा आरोपींसह निदा खान हिचाही धर्मांतर प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निदा खानचा पाय खोलात गेला आहे. मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुटकेसाठी निदा खानने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रकरण अत्यंत गंभीर स्वरुपाचे असल्याने न्यायालयाने तो फेटाळून लावला. Nashik TCS Case या प्रकरणात अनेकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, एसआयटीला (SIT) मिळालेल्या पुराव्यांनुसार, निदा केवळ या कटात सहभागी नव्हती, तर तिला विशिष्ट टार्गेट देण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे निदा खानवर अटकेची टांगती तलवार आहे. टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्यासह महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच धार्मिक भावना दुखावणे, गुंगीकारक औषधे देऊन अत्याचार करणे आणि पीडितांना धमकावणे अशा गंभीर आरोपांची टांगती तलवार निदा खानवर आहे. नेमकं प्रकरण काय ? (Nashik TCS Case) 2 एप्रिल रोजी एका पुरुष कर्मचाऱ्याने मुंबई नाका पोलिसात फिर्याद दिल्यानंतर टीसीएस धर्मांतर प्रकरण उजेडात आले. तपासादरम्यान तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना अटक करण्यात आली होती. Nashik TCS Case : निदा खानवर सोपवली होती ‘मिशन कन्व्हर्जन’ची जबाबदारी? TCS प्रकरणात धक्कादायक माहिती समोर सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान फरार असून तिच्या अटकेनंतर या प्रकरणाची व्याप्ती आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहेत का याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा : Yamuna river boat capsize: उत्तर प्रदेशात मोठा अपघात! यमुना नदीत ९ जणांना घेऊन जाणारी बोट उलटली ; महिलेसह निष्पाप चिमुकल्याचा मृतदेह सापडला, ४ मुले बेपत्ता