“ते’ एसटी कर्मचारी होते का? – जयंत पाटील
Updated On:

नागपूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी आलेले खरंच एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. याबरोबरच या हल्ल्याच्या नागपूर कनेक्शनबद्दल पोलीस तपास करत असून त्याबाबत अधिक बोलणे सध्या योग्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
नागपूर विमानतळावर जयंत पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. त्यामुळे त्यांच्याकडून शरद पवार यांच्या घरावरील आंदोलनाचे काम झाले नसावे. शरद पवार यांच्या घरावर आलेले खरंच एसटी कर्मचारी होते का? हे तपासले पाहिजे. याबरोबरच हे आंदोलक स्वतः आले की? त्यांना एकत्रित करून पाठवले याबाबत अजून माहिती समजली नाही.”




