Warren Buffett : वॉरेन बफे यांनी रोखले ‘गेट्स फाउंडेशन’चे दान
Warren Buffett : एपस्टीन चौकशी अहवालाकडे लक्ष : दोन दशकांत पहिल्यांदाच निर्णय लांबणीवर

Warren Buffett : प्रसिद्ध अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरन बफे (Warren Buffett ) यांनी गेल्या दोन दशकांत पहिल्यांदाच ‘गेट्स फाउंडेशन’ला दरवर्षी दिले जाणारे मधल्या काळातील नियमित दान तूर्तास रोखले आहे.
दिवंगत लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन आणि बिल गेट्स (Bill Gates) यांच्या संबंधांबाबत सुरू असलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल येईपर्यंत बफे यांनी हा निर्णय पुढे ढकलल्याचे सूत्रांनी सांगितले. ९५ वर्षीय बफे आता वर्षाच्या उत्तरार्धात, बहुदा ‘थँक्स-गिव्हिंग’च्या सुमारास या देणगीबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
एपस्टीन प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘गेट्स फाउंडेशन’ने ‘विल्मरहेल’ या विधी संस्थेची नियुक्ती केली असून, याचा अहवाल या उन्हाळ्यात येणे अपेक्षित आहे. न्याय विभागाने ‘एपस्टीन फाइल्स’ जाहीर केल्यापासून बफे आणि बिल गेट्स यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. (Warren Buffett )
बफे यांनी मार्चमध्ये स्पष्ट केले होते की, जानेवारीपासून त्यांचा गेट्स यांच्याशी कोणताही संवाद झालेला नाही आणि या फायलींमधून आणखी काय समोर येते, यावर ते लक्ष ठेवून आहेत. याच तणावामुळे गेट्स मे महिन्यात अनेक वर्षांत पहिल्यांदाच ‘बर्कशायर हॅथवे’च्या वार्षिक बैठकीला अनुपस्थित राहिले होते. (Warren Buffett )

Warren Buffett : वॉरेन बफे यांनी रोखले ‘गेट्स फाउंडेशन’चे दान
गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी २००६ ते २०२५ दरम्यान या फाउंडेशनला सुमारे ४८ अब्ज डॉलर्सचे बर्कशायर शेअर्स दान केले आहेत. मात्र, २०२१ मध्ये त्यांनी फाउंडेशनच्या विश्वस्तपदाचा राजीनामा दिला होता आणि आपल्या मृत्यूनंतर ‘गेट्स फाउंडेशन’ला कोणताही निधी मिळणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. (Warren Buffett )
दरम्यान, या निर्णयाचा बफे यांच्या कौटुंबिक फाउंडेशनना दिल्या जाणाऱ्या वार्षिक योगदानावर कोणताही परिणाम होणार नाही. दुसरीकडे, ‘गेट्स फाउंडेशन’ने २०४५ पर्यंत आपले कामकाज टप्प्याटप्प्याने बंद करण्याची आणि पुढील काही वर्षांत प्रशासकीय खर्चात कपात करत ५०० पदे कमी करण्याची योजना आखली आहे.





