#wari2019: प्राणवायूव्दारे वारकऱ्यांचे उपचार

सासवड: पुणे शहरातून काल संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट मार्गे सासवड मध्ये दाखल झाली. माऊलींची पालखी दोन दिवस सासवड मध्ये मुक्कामी आहे. यानिमित्ताने लोखोंच्या संख्येने पायी चालत वारकरी पालखी सोबत सासवड मध्ये दाखल झाले आहे.

दरम्यान, योग्य विद्या प्राणिक हिलींग फौंडेशन-महाराष्ट्र यांच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करण्यात येत आहे. कोणतेही औषोधोपचार न करता फक्त प्राणवायूव्दारे वारकऱ्यांचे उपचार करत आहे. आता पर्यंत साधारण १ हजार वारकर्यांनी प्राणवायूव्दारे आपले उपचार करून घेतले आहे.

सासवड मधील शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल येथे हा कॅम्प सुरू असून, गेली 3 वर्ष हे सतत वारकऱ्यांची सेवा करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.