Lonavala: लोणावळ्यात प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

लोणावळा – मागील तब्बल चार वर्षांपासून रखडलेल्या लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत ही सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता असून, बुधवारीप्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
विशेष म्हणजे, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे, ज्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. लोणावळा नगरपरिषदेत एकूण १३ प्रभाग असून त्यामधून २७ नगरसेवक निवडून जाणार आहेत. नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे.
प्रभागनिहाय आरक्षणाने रंगत वाढली
आज जाहीर झालेल्या प्रभागनिहाय आरक्षणामुळे निवडणुकीला नवी रंगत आली आहे. जे प्रभाग सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला आणि ओबीसींकरिता निर्धारित झाले आहेत, त्या ठिकाणी मोठी कांटे की टक्कर पहायला मिळेल.
प्रभागनिहाय आरक्षणाचे स्वरूप थोडक्यात खालीलप्रमाणे आहे:
- | प्रभाग क्र. | विभाग | आरक्षित जागा १ | आरक्षित जागा २ |
- | १ | न्यू तुंगार्ली | नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) | सर्वसाधारण |
- | २ | तुंगार्ली | नागरिकांचा मागास प्रवर्ग | सर्वसाधारण महिला |
- | ३ | वलवन | अनुसूचित जाती | सर्वसाधारण महिला |
- | ४ | रेल्वे विभाग | अनुसूचित जाती (महिला) | सर्वसाधारण |
- | ५ | नांगरगाव | सर्वसाधारण महिला | सर्वसाधारण |
- | ६ | भांगरवाडी | नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला | सर्वसाधारण |
- | ७ | भांगरवाडी | नागरिकांचा मागास प्रवर्ग | सर्वसाधारण महिला |
- | ८ | लोणावळा बाजारपेठ | अनुसूचित जाती | सर्वसाधारण महिला |
- | ९ | लोणावळा गावठाण | अनुसूचित जाती (महिला) | सर्वसाधारण |
- | १० | गवळीवाडा | नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) | सर्वसाधारण |
- | ११ | खंडाळा | अनुसूचित जमाती (महिला) | सर्वसाधारण |
- | १२ | जुना खंडाळा | नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) | सर्वसाधारण |
- | १३ | भुशी रामनगर (३ जागा) | नागरिकांचा मागास प्रवर्ग | सर्वसाधारण महिला (२ जागा) |
तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक जवळजवळ निश्चित झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. आरक्षण सोडतीमुळे आता या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत भरायला सुरुवात होणार असून, पुढील काही आठवडाभरात निवडणुकीचे साधक-बाधक चित्र स्पष्ट होईल.





