प्रभात वृत्तसेवा पुणे : बावधन-भुसारी काॅलनी प्रभाग १० मध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी चौकार मारणार, असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. भाजप-आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील, रूपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे, दिलीप वेडेपाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. प्रभाग १० च्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांनी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी सागर कॉलनी, शास्त्रीनगर परिसरातील पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी करून उमेदवारांचे स्वागत केले. महिला औक्षण करत पदयात्रेत सहभागी झाल्या.