वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर ; किरेन रिजिजू म्हणाले, “विधेयक आणलं नसत तर वक्फने संसदेवरही दावा केला असता”

Waqf Amendment Bill । वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मांडले. विधेयक सादर होताच विरोधकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने आरोप केला की त्यांना विधेयकाच्या प्रती उशिरा मिळाल्या आणि विधेयकाचा आढावा घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नाही.
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजजु यांनी आज लोकसभेत हे विधेयक सादर केले. यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या विरोधावर भाष्य केले. त्यांनी विधेयकाबाबत विरोधकांचे मन साफ नसल्याचा आरोप केला. तसलेच ज्यावेळी हे विधेयक सादर करण्यात आले त्यावेळी कोणतेही आक्षेप घेण्यात आले नव्हते असे म्हटले. पुढे त्यांनी यूपीएने दिल्लीतील संपत्ती वक्फ बोर्डाला दिल्याचेही म्हटले. तसेच अनेक सरकारी इमारतींवर वक्फने दावा केला आहे अशी माहिती देत किरेन रिजजू यांनी काँग्रेसवर टीका केली.
Waqf Amendment Bill ।
पुढे विधेयकाविषयी बोलताना रीजेजू यांनी,”आम्ही वक्फ आणलं नसतं तर वक्फने संसदेवरही दावा केला असता, असा हल्लाबोल देखील केला. दरम्यान, विधेयकावर ९७ लाख सूचना मिळाल्या असल्याचे म्हटले. तसेच केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक बाबीत हस्तक्षेप करत नसल्याची माहिती सभागृहाला दिली. वक्फ विधेयकात कोणत्याही धार्मिक स्थळांबाबत काहीही नाही हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Waqf Amendment Bill ।
वक्फ बोर्डावर शिया,सुन्नी, बोहरा आणि महिलाही यापुढे असणार असल्याची महत्वाची माहिती किरेन रिजजू यांनी यावेळी दिली. तसेच ४ बिगर मुस्लिमांसह २ महिला असणं अनिवार्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. २२ सदस्यांमध्ये ४ पेक्षा अधिक सदस्य बिगर मुस्लीम असू शकत नाहीत. तर १० सदस्य हे मुस्लिम असतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.





