तीन राज्यांत वॉन्टेड असलेल्या नक्षली म्होरक्याला अटक
Updated On:

बालाघाट – तीन राज्यांच्या पोलिसांसाठी वॉन्टेड असलेल्या एका नक्षली म्होरक्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बादलसिंग मकराम अस त्याचे नाव आहे. तो 22 वर्षीय आहे. त्याला पकडून देण्यासाठी तीन राज्यांनी एकत्रितपणे 12 लाख रूपयांचे इनाम लावले होते.
छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये तो वॉन्टेड होता. सुमारे शंभर माओवादी मध्यप्रदेशच्या बालाघाट भागात शिरल्याची माहिती गुप्तचर सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे पाळत ठेवली होती.
बंदलातोला भागात दोन नक्षलवादी काही खरेदी करण्यासाठी आले होते त्यावेळी पोलिसांनी मकरामला अटक केली पण त्याचा साथीदार मात्र पळून गेला. मकराम हा अनेक गंभीर स्वरूपातल्या गुन्ह्यातला आरोपी आहे.





