Walmik Karad phone calls । बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या पाय आणखी खोलात गेला आहे. कारण आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कराडला काल मोठा झटका बसला. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केज सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान,वाल्मिक कराड समोरील अडचणी त्याने केलेल्या ६ फोनकॉल्समुळे वाढल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. खंडणी आणि खूनाच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल्स Walmik Karad phone calls । काल वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर पोलीस पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये पोलीस वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागितली जाईल. पोलिसांच्या सूत्रांनूसार, विष्णू चाटे आणि खून प्रकरणातील आरोपी यांच्यादरम्यानचे सहा कॉल झाल्याचे सांगण्यात येत आहे. खंडणी प्रकरण आणि खूनाच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल्स झालेले आहेत आणि हे सहा फोन कॉल्स वाल्मिक कराडसोबत झाले आहेत. याबाबत आज पोलीस न्यायालयात माहिती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडणी प्रकरण त्यानंतर विष्णू चाटे यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सगळ्याचे धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत येऊन पोहचत आहेत त्यामुळे त्याच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा झाला आहे. वाल्मिक कराडच्या राज्याबाहेरील संपत्तीचा शोध Walmik Karad phone calls । दरम्यान, वाल्मिक कराडची कोठडी संपत असताना त्याला काल पुन्हा एकदा बीडमधील केज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांच्यावतीने युक्तीवाद झाला. यामध्ये अजूनही एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुख प्रकरणात आणखी बऱ्याच गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे. वाल्मिक कराडची राज्याबाहेर कुठे संपत्ती आहे, त्याचाही तपास बाकी आहे. पोलिसांकडून संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडच्याभोवतीचा फास आवळला जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराडची सुटका होणे सध्याच्या घडीला कठीण दिसत आहे. केज न्यायालयात सुनावणीदरम्यान खंडणी प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने पोलिसांची ही विनंती मान्य केली नाही आणि वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दिली. परंतु खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असती तरी जामीन मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला खूप खटाटोप करावा लागणार आहे. कारण आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. एखाद्या गुन्हेगारावर मकोका लागतो, तेव्हा बहुतांश काळ हा न्यायालय आणि कोठडी यामध्ये जातो.