Walid Muhammad Dib : लेबनॉनमध्ये सक्रिय असलेला हमासचा वरिष्ठ आर्थिक अधिकारी वालिद मुहम्मद दिब (Walid Muhammad Dib) याला ठार केल्याचा दावा इस्रायलच्या सुरक्षा दलांनी केला आहे. दिब हा लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या हमासच्या आर्थिक नेटवर्कमधील एक वरिष्ठ अधिकारी होता आणि त्याने अनेक प्रदेशातील दहशततवादी गटाच्या कार्यांसाठी निधी हस्तांतरित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे आयडीएफने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दिब (Walid Muhammad Dib) हमासच्या केंद्रीय वित्तीय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असे, जुडिया आणि सामरिया, लेबनॉन तसेच इतर देशांमधील विभागांना तो निधी हस्तांतरित करत असायचा आणि त्याचबरोबर सीरिया व लेबनॉनमधून दहशतवाद्यांची भरती देखील तो करत असायचा, असेही आयडीएफने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. Walid Muhammad Dib दरम्यान शुक्रवारी सकाळी लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान २० जण ठार झाले आणि ५७ जण जखमी झाले आहेत, असे लेबनॉनच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या अनेक हल्ल्यांची जबाबदारी हिजबुल्लाहने स्वीकारली आहे. मारून अल-रास शहराजवळ उत्तरेकडील इस्रायली सैनिकांवर अनेक ड्रोनने हल्ला केल्याचे या गटाने म्हटले आहे. तर नाहारियाच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागल्याचेही हिजबुल्लाहने (Walid Muhammad Dib) म्हटले असून, हा हल्ला करण्यापुर्वी या भागातील नागरिकांना तेथून स्थलांतर करण्याचा इशारा दिला गेला होता, असे म्हटले आहे.