पुणे जिल्हा | साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी वाळेकर

सोरतापवाडी, (वार्ताहर) – कोरेगाव मूळ येथील प्रा. सुरेश वाळेकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष पुर्व विभागपदी नुकतीच कुंजीरवाडी येथील झालेल्या कार्यक्रमात निवड झाली. तसे निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत नामगुडे यांनी दिले.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष, चित्रपट अभिनेता, गीतकार, संगीतकार, सुप्रसिद्ध शिव व्याख्याते शरद गोरे यांनी यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यातील तालुके गावे शाळा, महाविद्यालये, अशा ठिकाणी उत्तम प्रकारची साहित्य संमेलने, व्याख्यानमाला, सामाजिक प्रबोधन या माध्यमातून विचाराची ज्ञानगंगा वहावी.
तरुणांना ज्ञानाचा प्रकाश मिळावा या हेतुने पुणे जिल्ह्याच्या कानाकोपर्यात उत्कृष्ट दर्जाची संमेलने व्हावीत. यावेळी प्रमुख पाहुणे सूर्यकांत नामगुडे जिल्हाअध्यक्ष, किशोर टिळेकर कार्याध्यक्ष आदि मान्यवर उपस्थित होते. ज्योती दिलीप सराटे यांची महिला आघाडी अध्यक्षपदी निवड, शुभांगी घुले उपाध्यक्षा, सुनिल थोरात उपाध्यक्ष, सागर कांबळे कार्याध्यक्ष, धनंजय पवार उपाध्यक्षपदी तर ऋतुजा पवार सहकार्याध्यक्षापदी निवड करण्यात आली.





