राजगुरूनगर : विधानसभेच्या निकालानंतर आता जिल्ह्यातील नेतेमंडळींना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजगुरूनगर, चाकण नगरपालिकासोडून स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त होऊन अडीच वर्षांहून (राजगुरूनगर, चाकण नगरपालिकांना पाच वर्षांपासून अधिक) अधिक कालावधी झाला आहे. कधी करोना, आरक्षणाच्या मुद्द्यावरून तर कधी आरक्षणाच्या न्यायालयीनप्रक्रियेमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नव्या वर्षात निवडणुका होतील, अशी आशा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक निकालांचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणामहोण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, अशी अपेक्षा जिल्ह्यातील महायुतीचेस्थानिक नेते करू लागले आहेत. 20 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि त्यापाठोपाठ आळंदी नगरपालिकांचा कालावधी संपला. तेव्हापासून खेड तालुक्यातील जुन्या पद्धतीने 7 गट आणि 14 गण, तर राजगुरूनगर, चाकण, आळंदी नगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. नागरि समस्या जैसे थे स्थानिक स्वराज्यसंस्थांचा कारभार प्रशासकाद्वारे हाकला जात आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडल्यास ते जातीने लक्ष घालतात. किमान कार्यवाही सुरू होते. त्यामुळे पाणी, शाळा दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, सांडपाणी, नालेदुरुस्ती यांसारख्या समस्या सहज सोडवता येत होत्या; मात्र आता मनुष्यबळा अभावी सरकारी अधिकार्यांना या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. निवडणुका, सरकारी योजनांच्या कामात अधिकारी गुंतल्याने नागरी समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे. म्हणून निवडणूक होण्याची चिन्हे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांसंदर्भात प्रलंबित असलेल्या याचिकांमधील कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय प्रत्येक राज्यातील कारणमीमांसा आणि परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे समाधानकारक कारणे नसतील तर, अशा ठिकाणच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले जावू शकतात अशी महत्त्वपूर्ण टिपणीही न्यायालयाने केली. बहुसदस्यीय प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षण या दोनप्रमुख कारणांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत. याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वरील निर्देश देत कारणे पाहून पुढील आदेश देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या आनंदात भर पडली असून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा पुरेपूर ‘लाभ’ घेण्यासाठी तिनही पक्षांचे नेते व्यस्त होवू लागले आहेत.