पुणे जिल्हा : दौंड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची प्रतिक्षा; घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

नांदुर – दौंड तालुक्यातील पश्चिम पट्टयातील ताम्हाणवाडी, डाळींब, बोरीऐंदी, बोरीभडक या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतिक्षा काम धंदा सोडून पाण्यासाठी मजले ग्रामस्थांची पायपीट सुरु आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई; टँकरद्वारे पाणी चालु करावे मागणी अवघ्या घागरभर पाण्यासाठी रानावणात वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र तीव्र उन्हाळा आणि पावसाची लांबलेली उघडीप त्यामुळे बहुंतांश बोअरचे पाणी कमी झाले आहे. काहींचे पूर्ण बंद झाले आहेत.
पाणी येत नसल्याने व कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने जीव धोक्यात घालून शेतातील विद्युत वेळानुसार रात्री दिवसा येणाऱ्या पाण्याची वाट पहावी लागत आहे. शेतात सुरू असलेल्या पाण्यासाठी रात्री अपरात्री पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. तब्बल दोन महिन्यांपासून नागरिकांची कसरत सुरू आहे. मात्र लोकसंख्या अधिक असल्याने व अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. कामाला सुरुवात लवकरात लवकर करावी अशी मागणी देखील ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे. अजून किती दिवस कालावधी लागेल सांगता येत नसून सध्या असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने याची दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
गावाला फक्त १५ मिनिटे पिण्याचे पाणी येते. आम्ही दौंड गट विकास अधिकारी यांना लेखी पञ दिले आहे. आम्हाला पिण्याच्या पाण्याची खुप गरज आहे.लकरात लवकर टँकर सुरू करावा, असे डाळींब गावचे सरपंच बजरंग म्हस्के म्हणाले.
या गावामध्ये पाण्याच्या पाण्याची खुप बिकट अवस्था झाली आहे. अनेक दिवसापासुन गावाला पाणी कमी झाले आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा लवकर चालु करावी.तसेच प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी विनंती, ताम्हाणवाडीचे माजी सरपंच संदीप ताम्हाणे म्हणाले.
सध्या गावातीला पाण्याची पातळी कमी झाली आहे, प्रशासनाने भविष्यात गावाला पाणी कमी पडू नये म्हणुन पर्याय करावा, असे बोरीऐंदीचे सरपंच सविता भोसेकर म्हणाले.
गावची पाणी पुरवठा विहिर कॅनलच्या कडेला आहे,आता सध्या कॅनल पुर्ण पणे बंद झाला आहे.त्या मुळे गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे, गावामधील चंदनवाडी, खेडेकर वस्ती, आतकिरे वस्ती, म्हेञे वस्ती या ठिकाणी ग्रामपंचायत पिण्याचे पाणी पाईपलाईन नाही.त्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा लवकर चालु करावी.या मिशन अंतर्गत या पाण्याचे पाणी मिळेल. विघमान ग्रामपंचायत सदस्य अमोल म्हेञे म्हणाले.
सध्या फक्त डाळींब ग्रामपंचायत ने पिण्याच्या पाण्याची मागणी केली आहे इतर कोणत्याही गावाने मागणी केली नसल्याचे दौंड गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी सांगितले आहे.





