Wai Panchayat Samiti : वाई तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे विक्रांत डोंगरे यांची तर उपसभापतिपदी वर्षा जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर वाई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. नवनिर्वाचित सभापती विक्रांत डोंगरे यांनी तालुक्याच्या विकासासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर उपसभापती वर्षा जगताप यांनी देखील तालुक्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.