वाई – कोणताही घोटाळा झाला नसताना केवळ राजकारण म्हणून कॉंग्रेस खोटे आरोप करून देशाच्या विकासाला खिळ घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे व जगात देशाचा नावलौकिक वाढविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ वाई तालुका भाजपच्या वतीने शनिवारी सायंकाळी सहा वाजता वाईच्या किसन वीर चौकात राहुल गांधी व कॉंग्रेसचा जाहीर निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी व प्रचारादरम्यान अनेक वेळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “चौकीदार चोर है’ असे विधान केले होते. तसेच राफेल विमान खरेदी प्रकरणी घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारून माफी मागण्याचा आदेश दिला होता. तसेच राफेल विमान खरेदी व्यवहारात केंद्र सरकारने पारदर्शकता न ठेवून घोटाळा केल्याचा कॉंग्रेसने केला होता. त्याबाबत ही कोर्टाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली आहे.
त्याबद्दल राहुल गांधी याचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष काशीनाथ शेलार, वाई तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे, शहराध्यक्ष अजित वनारसे, यशवंत लेले यांनी यावेळी राहुल गांधी व कॉंग्रेसचा निषेध करत आपले मनोगत व्यक्त केले. वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, शहर युवक अध्यक्ष राकेश फुले, शहर उपाध्यक्ष प्रशांत नागपूरकर, सरचिटणीस सचिन गांधी, विजय विभुते, अरविंद बोपर्डीकर, शहर महिला आघाडीच्या समन्वयक समृध्दी गोरे, ज्योती गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.