पुणे जिल्हा | वाघोली 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

वाघोली, (प्रतिनिधी)- 17 वर्षीय मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाघोलीत घडली. मुलीवर अत्याचार होऊनही तिच्या आईने अत्याचार करणार्याची साथ दिल्याने आईसह तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 तासाच्या आत तिघांना अटक करण्यात आली.
याबाबत पीडितेने लोणीकंद पोलीसात फिर्याद दिली. अविनाश शेळके, गोविंद काकड व तिची आई (तिघेही रा. वाघोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडिता ही एका कापड दुकानात काम करते. तिथे शेळके याच्याशी तिची ओळख झाली. शेळके याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी हिच्यासोबत दोन तीन वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध केले.
तसेच स्वतःच्या मोबाईलमध्ये फिर्यादीचे उघडे फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा शारिरीक संबंध केले. तर काकडे हा फिर्यादीच्या आईचा मित्र आहे. त्याने ही एके दिवशी फिर्यादीची आई घरात नसताना जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक सबंध ठेवले.
तिने ही बाब आपल्या आईला सांगितली; मात्र आईने तिलाच धमकी देऊन काकडे याचे नाव कुठेही घ्यायचे नाही. अशी उलट धमकी दिली. यानंतर तिला एका सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले. तेथे तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तिने स्वतः पोलीसात तक्रार दिली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
-सीमा ढाकणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकंद पोलीस ठाणे





