वाघोली: धोकादायक वळण काढून टाका; आमदार अशोक पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Updated On:

वाघोली: केसनंद ते लोणीकंद या अष्टविनायक महामार्गावरील जोगेश्वरी मंदिराजवळ धोकादायक वळण असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी समक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी संबंधित रस्त्याचा त्वरित सर्व्हे करून या ठिकाणी स्पीडब्रेकर बसवणे व धोकादायक वळणे काढून टाकणे याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला आमदारांनी केल्या.
याप्रसंगी माजी सरपंच एस पी हरगुडे, माजी सरपंच चंद्रकांत सातव, दत्ता हरगुडे, पांडुरंग हरगुडे, अनिल हरगुडे व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. धोकादायक वळण काढून टाकण्याबाबत यापूर्वी वनमित्र चंद्रकांत वारघडे यांनीही प्रशासनाकडे मागणी केली होती.





