वाघोली- लोणीकंद परिसरात पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या महावितरणच्या डीपी आणि मोरीमध्ये नागरिक कचरा टाकून तो जाळत असल्याने महावितरणच्या वायरिंगचे नुकसान होत आहे. यामुळे परिसरातील वीजपुरवठा काही तासांसाठी खंडित करावा लागत आहे. महावितरणने महापालिका आणि ग्रामपंचायतीला कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सूचना दिल्या असून, नागरिकांना डीपी आणि एचटी लाईनजवळ कचरा टाकू नये, असे आवाहन केले आहे. “वाघोलीतील कोणत्याही डीपीजवळ कचरा टाकून तो जाळू नये. वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरण आणि मनपा अधिकाऱ्यांमार्फत कचरा टाकणाऱ्यांवर आणि जाळणाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करू,” असे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.