‘मनपा’कडून वाघेश्वर मंदिरासमोरील विकास कामासाठी 40 लाखांचा निधी

वाघोली – वाघोली (ता.हवेली) येथील श्री क्षेत्र वाघेश्वर देवस्थानच्या समोर असणाऱ्या मोकळ्या जागेत दगडी फरशी कामासाठी पुणे महानगरपालिकेकडून 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन देवस्थानच्या महिला संचालिका डॉ. स्मिता चंद्रकांत कोलते, प्रियंका काळे, वाघोली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाघोलीमधील विविध विकास कामांसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे वाघोलीतील विकास कामांसाठी महानगरपालिका यांच्याकडून निधी मंजूर व्हावा यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. दाभाडे यांच्या पुराव्यास यश प्राप्त झाले असून वाघेश्वर देवस्थान साठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने नागरिकांकडून तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांचे अभिनंदन केले जात आहे.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, शिवदास उबाळे, राजेंद्र पायगुडे, अनिल जाधवराव, सुनील कावडे, संदीप थोरात, शैलेश जाधव, रोहिदास गोरे, गुरु शेट्टी, रवी काळे, ज्ञानेश्वर धोत्रे, अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. वाघेश्वर देवस्थानच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा मान महिलांना दिल्याने देवस्थानच्या संचालक व पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.
“वाघोली येथील विकास कामांसाठी तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत, तत्कालीन मनपा आयुक्त विक्रम कुमार, यांनी विशेष निधी मंजूर करणे कामी केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थ, देवस्थानच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहे.” – राजेंद्र सातव पाटील(अध्यक्ष, वाघोली विकास प्रतिष्ठान तथा वाघेश्वर देवस्थान वाघोली)





