वाघोलीचे उद्योजक गाडेंचा भाजपमध्ये प्रवेश
Updated On:

वाघोली – वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संपत गाडे यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गाडे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब सातव, भाजप जिल्हा चिटणीस प्रवीण काळभोर, भाजयुमोचे स्वप्नील उंद्रे, श्रीकांत कांचन व मान्यवर उपस्थित होते. पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी संपत गाडे यांची मोलाची भूमिका आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला निश्चितच फायदा होणार आहे. आगामी शिरूर-हवेलीचे विधानसभा निवडणुकीमध्ये संपत गाडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पक्ष देईल ती जबाबदारी पार पडण्यासाठी सज्ज राहू, असे संपत गाडे यांनी सांगितले.





