Wagholi : वाघोलीत गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठी तयारी; महामार्ग टाळण्याचे मंडळांना आवाहन
Wagholi : वाघोलीतील गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी पोलिसांची बैठक; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन.

Wagholi : गणेशोत्सवातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी वाघोली पोलीस ठाण्यात गुरुवारी बैठक झाली. २० ते २२ गणेश मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मिरवणूक मार्गावरील लटकलेल्या वीजतारा, विजेचे पोल, झाडांच्या फांद्या आणि अतिक्रमणे हटविण्याबाबत संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे. ही कामे पुढील चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मुख्य महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मिरवणूक अंतर्गत रस्त्यांवरून नेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी केले. मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ध्वनिक्षेपक, डीजे आणि विद्युत रोषणाईबाबत नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.





